तुळजापूर व धाराशिव येथील एस.टी बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करणार – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक

Spread the love

धाराशिव दि.१२ जुन – प्रवासी जनता व विविध प्रसार माध्यमांनी धाराशिव व तुळजापूर येथील एसटीच्या बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवलेल्या आहेत.या तक्रारीची गंभीर दाखल घेऊन या दोन्ही बसस्थानकाच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.अशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा वाया घालवणाऱ्या प्रवृत्तीला कठोर शिक्षा केली जाईल,असे नि:संधिग्द आश्वासन परिवहन मंत्री,एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.ते आज धाराशिव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले,मी १ मे रोजी धाराशिव व तुळजापूर येथील बसस्थानकांचे उद्घाटन केले.परंतु नंतर चौकशी केली असता मला असे समजले की,त्या बसस्थानकाचे काम अद्यापि पूर्ण झाले नव्हते.अशाप्रकारे घाईघाईत उद्घाटन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती ते दोषी ठरले असतील तर यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. शासनकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून त्यांच्या सोयीसाठी बसस्थानके बांधली जातात.अशा पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा ही नागरिकांची किमान अपेक्षा असते.परंतु केवळ महिन्याभरातच बसस्थानकाच्या बांधकामाबाबत तक्रारी येत असतील तर ते योग्य नाही.अशा निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.असे प्रतिपादन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.

  • Related Posts

    पथदिव्यांच्या पोलवरील होर्डिंगचे सांगडे काढण्यास नगरपालिका धजना

    Spread the love

    Spread the loveसांगडे जैसे थेच… डिजिटल बॅनरपासून शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवण्याचे नगरपालिकेचे आश्वासन? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची धाराशिव नगरपालिकेकडून पायमल्ली धाराशिव : शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांच्या पोलवर अनधिकृतपणे बसवलेले बॅनर सांगडे आजही…

    सेंट्रल बिल्डिंगच्या मागे थाटले दारु वासयुक्त ओपन बिअर बार !

    Spread the love

    Spread the loveराज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बारगजे यांचा प्रताप ! अभिलाषी सुगंधामुळे न पिताच अनेकजण झिंगाट ; धाराशिव  – जिल्ह्याच्या विविध भागात रात्रोसपणे दारू विक्री केली जाते. यामध्ये गल्लीबोळ व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *