
धाराशिव जिल्ह्यात एसटी महामंडळाचा विभागीय अभियंता अभियंता शशिकांत उबाळे दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडला आहे.विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरामध्ये झालेल्या नूतन बसस्थानकामधील वाहन तळ ठेका (पार्किंगचे टेंडर) देण्याच्या बदल्यात संबंधित अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने धाराशिव शहरातील बसस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याच कार्यक्षेत्रात घडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एसीबीकडून पुढील चौकशी सुरू असून, लाचखोरी प्रकरणामुळे एसटी विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.