कळंब पोलिसांची धडक कारवाई; कन्हेरवाडी शिवारात १५ लाखांचा अफू जप्त ?

Spread the love

कळंब (प्रतिनिधी) -: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल १०० किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या मालाची बाजारपेठीय किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हेरवाडी शिवारातील शेत गट नंबर ३१६ मध्ये अफूची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही जमीन विलास नवनाथ कवडे यांच्या मालकीची आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाड टाकली.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा
सदर कारवाई अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार, कृषी अधिकारी आणि दोन शासकीय पंचांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या समक्ष संपूर्ण शेताची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी अफूची झाडे आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण (व्हिडिओग्राफी) करण्यात आले.

१०० किलो माल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अफूच्या झाडांचे वजन अंदाजे १०० किलो आहे. बाजारभावाप्रमाणे १५ हजार रुपये प्रति किलो या दराने एकूण १५ लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.

या प्रकरणी विलास नवनाथ कवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थांची लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखी कोणाचे सहकार्य लाभले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *