14 घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .

Spread the love

दिनांक 18/07/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे लोहरा गु. र.नं.12/2025 क. 331(4) 305(a) भान्यास या गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे धर्मेंद्र ऊर्फ काळया विलास भोसले वय 23 वर्ष रा. शिंदगाव ता तुळजापूर हा. मु. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव हा धाराशिव शहरात आहे. अशी बातमी मिळाल्यावर त्यास पथकाने सीताफिने ताब्यात घेऊन त्याच्या कडे जिल्ह्यातील घरपोडीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने पोस्टे मुरूम, लोहारा ,नळदुर्ग, तुळजापूर च्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावरून धाराशिव जिल्हा पोलीस गुन्हे अभिलेख तपासले असता त्याचे कडून एकूण घरपोडीचे 14 गुन्हे उघडकीस आले नमूद गुन्ह्या तील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या वाट्याला आलेला चोरीचा मुद्देमाल हा त्याने एका सोनारास सदरचे दागिने त्याच्या पत्नीचे आहेत असे सांगून विकले असल्याचे सांगितले. नमूद सोनाराकडून एकूण 70 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 6,30,000 रुपये चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे लोहारा येथे पुढील कारवाई कामे हजर केले आहे . सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक- सुदर्शन कासार, पोलीस हावलदार- शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण,महिला पोलीस हावलदार- शैला टेळे,पोलीस नाईक- अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार- नितीन भोसले, रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *