“ऑनलाईन गेमद्वारे जादा पैशाचे अमिष दाखवून फसवणूक करणारे अटक, धाराशिव सायबर पोलीसांची कामगीरी .”

Spread the love

धाराशिव जिल्हयातील कळंब शहरात बीडीजी गेम, दमन गेम व टी. सी. गेम या ऑनलाईन गेमचे रॅकेट सुरू असल्याचे सायबर पोलीसांना माहिती मिळाल्याने सायबर पोलीस ठाण्याचे पोनि चोरमले, सपोनि कासुळे व पथकाने गांव तडवळे ता. कळंब जि.धाराशिव येथे छापा टाकला असता इसम नामे उत्तरेश्वर दामोधर इटकर वय ४५ वर्ष धंदा मार्केटींग रा. सोनेसांगवी, ता. केज, जि. बीड व अस्लम दस्तगीर तांबोळी वय ३२ वर्ष धंदा मार्केटींग रा. शेळका धानोरा, ता. कळंब जि . धाराशिव हे बीडीजी गेम, दमन गेम व टी.सी. गेम या सारखे ऑनलाईन गेमच्या लिंक व्हॉट्सॲपद्वारे लोकांना पाठवून कमी पैशात जास्त पैशाचे अमिष दाखवून ऑनलाईन गेमचा जुगार खेळताना मिळून आले. त्यानंतर सदर इसमांना ताब्यात घेउन सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, सदर गेमचे लॉगिन आयडी व पासवर्ड त्यांना इसम नामे सुरज घाडगे रा. सातेफळ ता. केज जि.बीड मो. क्र. ९६९७७९०७०७, नामदेव कांबळे रा. अंबेजोगाई जि. बीड मो. क्र. ८३८०८४४९४९ व एम. डी. पाटील रा. नांदेड मो. क्र. ८७७९४७४९८५ यांनी पुरवले आहेत. तसेच सदर ताब्यात घेतलेल्या इसमांचे व्हॉट्सअॅप चॅटींग तपासले असता सदर आरोपीनी अनेक लोकांना व्हॉट्सॲपद्वारे वर नमूद गेमच्या लिंक पाठवून त्यांना ऑनलाईन गेम खेळण्यासाठी लॉगिन आयडी पासवर्ड देउन त्यांना जादा पैशाचे अमिष दाखवून ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे.

त्यामुळे इसम नामे १) उत्तरेश्वर दामोधर इटकर वय ४५ वर्ष धंदा मार्केटींग रा. सोनेसांगवी, ता. केज, जि. बीड २)अस्लम दस्तगीर तांबोळी वय ३२ वर्ष धंदा मार्केटींग रा. शेळका धानोरा, ता. कळंब जि. धाराशिव ३) सुरज घाडगे रा. सातेफळ ता. केज जि.बीड मो. क्र. ९६९७७९०७०७, ४) नामदेव कांबळे रा. अंबेजोगाई जि. बीड मो. क्र. ८३८०८४४९४९ व ५) एम.डी. पाटील रा.नांदेड मो. क्र. ८७७९४७४९८५ यांनी संगनमताने शासनाची बंदी असलेले बीडीजी ऑनलाईन गेम, दमन ऑनलाईन गेम व टी.सी. ऑनलाईन गेम या सारख्या ऑनलाईन गेमच्या लिंक व्हॉट्सअॅपद्वारे लोकांना पाठवून कमी पैशात जास्त पैशाचे अमिष दाखवून ऑनलाईन गेमचा जुगार खेळवून स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अनेक लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे व करत आहेत म्हणून सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १७/२५ कलम ३१८ (४), ३(५) भान्यासंसह कलम ६६ (क),६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा सह कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एच. चोरमले हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती. रितू खोखर सो. व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती. शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कासुळे, सफौ कुलकर्णी, पोहक. ११२९ /हालसे, मपोना ५३ / पौळ, पोशि १०३६ / जाधवर, पोशि १७७७ / भोसले, पोशि १८१७ / मोरे, पोशि २६३ / तिळगुळे, पोशि १६०९/ कदम, पोशि ८५ / काझी, मपोशि ७१८ / शेख, मपोशि १६६९ / खांडेकर, पोशि ९७१ / शिंदे, पोशि १२६ / पुरी, पोशि १८९४ /अंगुले पोशि १६५ / बिराजदार व पोशि ८० / गाडे यांनी केली आहे.

सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेसेज / लिंक / फोन / क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देउ नये किंवा लिंकवर क्लिक / क्यू आर कोड स्कॅन करू नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र. 1930 वर कॉल करून सायबर गुन्हयाची माहिती दयावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा.

  • Related Posts

    “तू हे बंदुकीसाठी करतोयस!” — हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणप्रकरणात पोलिसांची टाळाटाळ; गुन्हा नोंदवण्यास नकार?

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण व मारहाण प्रकरणात शहर पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आता खुद्द मडके यांनीच केला आहे.…

    धाराशिव एसटी महामंडळाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच जिल्ह्यात लाचखोरीचा प्रकार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव जिल्ह्यात एसटी महामंडळाचा विभागीय अभियंता अभियंता शशिकांत उबाळे दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडला आहे.विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरामध्ये झालेल्या नूतन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *