सराफ व्यवसायिकावर दरोडा टाकणारे तिघे अटकेतधाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – १.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – परंडा तालुक्यातील एका सराफ व्यवसायिकावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या तीन दरोडेखोरांना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोटरसायकल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९७ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

सदरील गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की, परंडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८८/२०२५ कलम ३०९, ३ (५) भा.दं.वि. अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) हा बारलोणी येथे असल्याचे समजले. पथकाने त्याला ताब्यात घेतले असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर पथकाने परंडा येथील राजू सिद्धू शिंदे (वय ४०, रा. समता नगर, कुर्डवाडी रोड, परंडा) यास त्याच्या राहत्या घरी ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावरून पुढील तपास करताना सर्जेराव सखाराम डिकोळे (वय ४६, रा. लव्हळ, ता. माढा, जि. सोलापूर) यास अटक करण्यात आली.

या तिघांकडून पोलिसांनी एक मोटरसायकल, सोन्याचे दागिने व २३,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींना पुढील तपासासाठी परंडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, पोह. जानराव (३२७), वाघमारे (१००३), अमोल निंबाळकर (५३०), गादेकर (१४३१), राठोड (३९७), पठाण (५७६),जावेद काझी (२८९), औताडे (९२९), पोना. ढगारे (१६३१), चालक घुगे (६७), अरब (१२४८), पोअं. बोईनवाड, डोंगरे (५३९) यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे पोउपनि बहुरे आणि दंगल नियंत्रण पथकाचे अमलदार सहभागी होते.

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, गुन्हेगारांविरोधात पोलिसांची ही सजगता जनतेच्या सुरक्षेचा आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *