तुळजापूर येथे चोरीचे दागिने व चार मोटारसायकलसह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Spread the love

धाराशिव  – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर येथे धाडसी कारवाई करत चोरीचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या दोघा आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,७५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून चार मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपावार यांच्या आदेशाने करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पथक पेट्रोलिंग करत असताना खात्रीलायक बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीचे दागिने आणि मोटारसायकल विक्रीसाठी दोन आरोपी तुळजापूर येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत धोंडीराम महादेव शिंगाडे (वय ४२ वर्षे, रा. शिरवळ, ता. मान, जि. सातारा) वआणि अनिल हरिश्चंद्र माने (वय ३३ वर्षे, रा. वडगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातील चार मोटारसायकल्स आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपींनी धाराशिव, सोलापूर ग्रामीण, तुळजापूर आदी भागांमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध धाराशिव पो.ठा. गु.र.नं. १९८/२०२५ – कलम ३०२(ब), ४ भा.दं.वि. धाराशिव पो.ठा. गु.र.नं. ८६/२०२३ – कलम ३७९, सोलापूर ग्रामीण पो.ठा. गु.र.नं. १६३/२०२५ – कलम ३०९(४), ४(४), सोलापूर पो.ठा. गु.र.नं. १८०/२०२३, तुळजापूर पो.ठा. गु.र.नं. १६०/२०२५ अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत:
सदरील कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी — पोहे/३२७ जानराव, पोहे/१००३ वाघमारे, पोहे/१४७९ जाधवर, पोना/१६११ जाधव, चालक पोहे/१२४८ अरविंद, पोहे/६९३ दहीहांडे, पोहे/बोडाईवाला — यांनी परिश्रम घेतले.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक इज्जपवार यांच्या आदेशान्वये पथकाने केलेल्या कारवाईचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029…

    पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

    Spread the love

    Spread the loveपोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *