
परंडा – २७ मे २०२५ रोजी परंडा शहरात एक धक्कादायक घटना घडली. सरकारी दवाखान्याच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण गांजाचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ धाड टाकली आणि १० जणांना रंगेहाथ पकडल्याने परंडा तालुक्यात खळबळ माजली.
सदरील कारवाई दरम्यान पोलिसांना सुमारे ९६७ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला, ज्याची किंमत सुमारे २०,००० रुपये असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा गांजा कॅरीबॅगमध्ये व कागदात गुंडाळून ठेवलेला होता, तर काहीजण तो चिलीममध्ये भरून तिथेच सेवन करत होते. याची माहिती सूत्रांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधीकाऱ्यांना
मिळताच क्षणाचा विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी दहा टाकून गांजाचे सेवन करत असलेले
आरोपी – फारुख हबीब सय्यद (वय 52), बाबा भिवा शिंदे (वय 65). काशिनाथ तुकाराम नरुटे (वय 55), मुस्तफा शुकरखा पठाण (वय 42), सुधाकर आबासाहेब देशमुख (वय 69), जमिर गफुर सौदागर (वय 63), युसुफ पटेल (वय 55, जि. सोलापूर), अनिल प्रतापसिंग परदेशी (वय 50), नितीन अंबरुषी शिरसकर (वय 42) हे सर्व जण परंडा शहर व परिसरातीलच असून याच्यावर कारवाई झाल्याने गांजा विक्री आणि सेवनाच्या या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या सर्वांवर परंडा पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू
या सर्वांविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(ii)(a) आणि 27 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंडा पोलीस ठाण्याचे तपास सुरू आहेत.
धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईने परंडा तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.