तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 37 वा आरोपी निष्पन्न, एक अटकेत,पोलिसांची मोठी कारवाई

Spread the love

धाराशिव – तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी मोठी कारवाई केली असुन शुभम नेप्ते या आरोपीस अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीचा तपास सुरु असुन आरोपीची संख्या आता 36 वरून 37 वर झाली आहे. पोलिसांना शुभम नेप्ते याच्या विरोधात पुरावे सापडल्याने त्याला अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग सापडून आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली, तुळजापूर येथून त्याला अटक केली असून आज कोर्टात हजर केले जाऊ शकते.

नुतन पोलीस अधीक्षक रितु खोकर यांनी पदभार स्वीकारताच ड्रग्ज तस्करी गुन्ह्याच्या तपासाला पुन्हा गती आली असुन आरोपींची संख्या वाढली आहे, तपास अजुन संपलेला नाही, अनेक जन रडारवर आहेत असेच या निमित्ताने म्हणावे लागेल. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीसांनी कोर्टात 10 हजार 677 पानाचे चार्जशीट दाखल करताना 15 एप्रिल रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर याला आरोपी केले होते, त्यानंतर दीड महिन्यानंतर 37 वा आरोपी निष्पन्न होत अटक केला आहे, हे मोठे यश आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *