स्थानिक गुन्हे शाखेने कळंब पोलीस ठाणे हद्दीतील महिलेचे खुनाचे गुढ उडघडले

Spread the love

धाराशिव / कळंब – पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरून दिनांक 01. 04. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि इज्जपवार, सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून उपविभाग कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत काही दिवसापुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे येरमाळा कळंब रस्त्यावर थांबले आहेत व ते कोठेतरी निघून जायचे तयारीत आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून एका निर्जन ठिकाणी 02 संशयित इसम थांबलेले दिसून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे- राण्या उर्फ रामेश्वर माधव भोसले, वय 32 वर्षे,व्य.वाहनचालक व उस्मान गुलाब सय्यद, वय 29 वर्षे, व्य. वाहनचालक दोघे रा. केज, ता. केज जि. बीड असे सांगितले त्यांना विश्वासात घेवून त्यांचे कडे चौकशी केली असता त्यातील रामेश्वर भोसले यांनी सांगीतले व्दारकानगरी कळंब येथे राहण्यास असलेल्या एका महिलेचा खुन केला असल्याने तसेच उस्मान सय्यद याने मला गेल्या काही दिवसात नुमद महिलेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत सुचविले असे सांगितले. त्यावर पथकाने ताब्यात घेतलेले दोन्ही इसम हे गुरनं 119/2025 कलम 103(1),249, 239 भा.न्या.सं. गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केले. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी,फरहान पठाण यांच्या पथकाने केली आहे.

  • Related Posts

    मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029…

    पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

    Spread the love

    Spread the loveपोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *