
धाराशिव (प्रतिनिधी) दिनांक 26. 03. 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक असे धाराशिव जिल्हृयातील अभिलेखा वरील गुन्हे उघडकीस आणणे करीता रवाना झाले असता त्यांना गोपनीय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत डिकसळ पाटी जवळ झालेल्या जबरी चोरीलतील आरोपी हे कळंब पारधी पिढी येथे असुन त्यांची नावे लल्ल्या, मिर्च्या व गंग्या पवार असे आहेत. सदर बाबत तात्काळ सुत्रे हालवून नुद पथकाने लल्ल्या उर्फ अनिल बादल शिंदे, रा. मोहा पारधी पिढी कळंब व मिर्च्या उर्फ आकाश रवि काळे, रा. कळंब पारधी पिढी कळंब यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी साधारण पंधरा दिवसापुर्वी डिकसळ पाटीजवळ एका पती पत्नीला आडवून त्यांचे सोन्याचे दागिने लुटले असल्याचे कबूल केले.त्यावरुन पोलीस ठाणे कळंब येथील गुन्हे अभिलेख तपासला असता सदर बाबत गुरनं104/2025 कलम 309 (4), 126(2), 3(5) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.त्यावरुन ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे चोरी केलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल त्यांचा साथीदार गंगाराम बापू पवार याची केज येथे राहणारी बहिन सोनाली काळे हिच्या मदतीने केज येथील एका सोनाराला विकला असल्याची माहिती दिली.प्राप्त माहिती तात्काळ पोनि इज्जपवार यांना कळवून त्यांचे परवाणगीने तात्काळ केज येथे जावून चोरी केलेला मुद्देमाल 4.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्नफुले, मंगळसुत्र, मणी, असे एकुण 27,000₹ किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करुन जप्त करण्यात आला. नमुद आरोपींनी चौकशी दरम्यान त्यांनी पोस्टे युसुफवडगाव जि.बिड येथे अन्य एक जबरी चोरी केली असल्याची माहिती दिली. जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेले दोन आरोपी पुढील कार्यवाहीस्तव पोस्टे कळंब यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी, चापोका- रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.