आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही देशमुख कुटुंबियासोबत – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

बीड – मस्साजोता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. 09/12/2024 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानमंडळासह सर्वत्र पडले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज संसदेचे अधिवेशन संपताच मस्साजो येथे जावून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सात्वन केले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री मा. ना. श्री. अमित शहा यांना महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात नेमलेल्या एस.आय.टी.ला निपक्षपातीपणे तपास पुर्ण करणेबाबत निर्देश देण्याची विनंती केली आहे. आज कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशी करुन निर्घुणपणे एखाद्याचे जिवन व कुटुंबास उध्दवस्त करणाऱ्या वृत्तीला कायद्याव्दारे कठोर शिक्षा करावी व भविष्यात अशा प्रकारेचे कृत्ये करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. अशा कठोर उपाययोजना करुन त्याची आंमलबजावणी करावी. अशी मागणी केली आहे. तसेच आपण देशमुख कुटुंबियाना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले.

  • Related Posts

    मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029…

    पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

    Spread the love

    Spread the loveपोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *