
पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेत रविंद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली. रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रविंद्र धंगेकर यांनी व्यक्ती केली.