
मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी विविध राजकीय आणि स्थानिक मुद्द्यांवर आढावा घेतला व सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई तसेच आमदार स्वामी देखील उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.