
धाराशिव – धाराशिव नगरपालिका माजी नगरसेवक राणा बनसोडे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत ( UBT) घरवापसी केली आहे. शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते राणा बनसोडे यांचे स्वागत करण्यात आले.
राणा बनसोडे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांना पक्षात आणण्यासाठी काही मुद्दे आणि आश्वासने दिली होती. मात्र, काही बाबी असत्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली.
शिवसेनेत परत येताच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमुख रवी वाघमारे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, पंकज पाटील, राहुल बनसोडे, प्रताप शेंडगे, रियाज भाई, आनंद बनसोडे, रवी कोरे, शाहबाज पठाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.