
धाराशिव शहर पोलीस ठाणे व नगर पालिका प्रशासनाची जबरदस्त कामगिरी
धाराशिव – धाराशिव शहरात करण्यात येत असलेली जनावरांची कत्तल वारंवार कारवाई करून देखील व सूचना तसेच कारवाई करून देखील थांबत नव्हत्या. विशेष म्हणजे गोवंश कत्तल करण्यास बंदी असताना देखील गोवंशीय जनावरांची देखील मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस पोलीस प्रशासन या ठिकाणी जाऊन गोमास व विक्रीसाठी जाणाऱ्या वाहनांस जप्त करून संबंधितांना अटक करून कारवाई जात होती. मात्र या कत्तली करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही. त्यामुळे वैतागलेल्या पोलीस व नगर पालिका प्रशासनाने चौधरी द्या कारवाई करण्याचा निर्णय घेत खिरणी मळा व रसूलपुरा या परिसरात अनधिकृत खास जनावरांच्या कत्तलीसाठी उभारण्यात आलेले कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने अक्षरशः जमीनदोस्त करून त्यांचा नायनाट केला आहे. त्यामुळे परिसरात असलेली व होणारी दुर्गंधी देखील यामुळे नष्ट होणार असून यापुढे अशा प्रकारची कृती करण्यासाठी कोणीही धजावणार नाही. ही कामगिरी धाराशिव शहर पोलीस ठाणे प्रमुख शकील शेख व नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दि.१० मार्च रोजी सकाळी केली आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे व नगर पालिका यांनी संयुक्तिक कारवाई करून खिरणी मळा व रसूलपुरा भागात जनावरांचे कत्तलखाने राजरोसपणे थाटलेले आहेत. विशेष म्हणजे या कत्तलखाण्यासाठी शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. तरी देखील मनमानीपणे हे अवैध कत्तलखाने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी चालत होते. विशेष म्हणजे राज्य सरकारने कत्तल करण्यास बंदी घातलेली असताना देखील तर समजनावरांची खुलेआमपणे कत्तल करून ते मास जिल्ह्यासह मुंबई पुणे व विदेशात देखील विकले जात होते. त्यासाठी मोठे रॅकेट सक्रियपणे कार्यरत होते. धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कत्तलखाने असल्यामुळे पोलीस प्रमुख व नगरपालिका प्रशासनावर वारंवार टीका होत होती,. तसेच संबंधित कत्तलखाने धारकास सांगून व कारवाई करून देखील कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे ते सर्व कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेऊन तेवढ्यावरच न थांबता थेट त्याची अंमलबजावणी करून ते सर्व कत्तलखाने जेसीबीच्या साह्याने अक्षरशः भुईसपाट केले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक शाफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, एपीआय अंभोरे, पीएसआय संदीप ओहोळ, पीएसआय अक्षय डिघोळे यांच्यासह पोलीस अंमलदार व नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या. कर्मचारी यांनी केली यावेळी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगर्डसह नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.