
धाराशिव: युवासेना विभागीय सचिव आणि धाराशिव जिल्हाप्रमुख अक्षय संजीव ढोबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक गटबाजीमुळे त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ढोबळे यांनी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी स्थानिक गटबाजीमुळे पक्ष सोडत असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.
अक्षय ढोबळे हे धाराशिव नगरपालिकेचे माजी नगरसेवक देखील आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे.