
धाराशिव (प्रतिनिधी) -: महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक दिनांक य १२ जून २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असून त्यांचा दौरा हा हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर येथून सुरू होणार आहे, सोलापूर येथून सकाळी आठ वाजता निघून ते नळदुर्गकडे रवाना होणार आहेत,
या दौऱ्यात पालकमंत्री नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथून आपल्या दौर्याची सुरुवात करणार असून. सकाळी नऊ वाजता नळदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहेत नंतर ते धाराशिव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात आकरा वाजता विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते दुपारी सव्वा एक वाजता कळंब येथे शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार असून तेथून ते बीड कडे रवाना होणार आहेत.
या दौर्यादरम्यान जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार असून, विविध प्रलंबित विषयांवर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.