शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे पत्र वितरित बाबत सखोल चौकशी करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

Spread the love

मुंबई : शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीत विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकापर्यंत समप्रमाणात, पारदर्शकपणे आणि योग्य पद्धतीने पोहोचला पाहिजे. विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यपद्धती अवलंबावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विशेषतः शाळांना अल्पसंख्याक दर्जा देताना नियमांचे काटेकोर पालन व्हावे, कोणत्याही प्रकारचा गैरवापर होऊ नये, यावर भर देत त्यांनी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव मनोज जाधव, उपसचिव मि. प. शेणॉय, अवर सचिव सारंगकुमार पाटील, अवर सचिव जहांगीर खान, अवर सचिव विशाखा आढाव तसेच अवर सचिव मेघना शिंदे उपस्थित होत्या.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *