कामाचा माणुस – अजित पवार यांचे फोटो व्हिडिओ पाठवा, विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘कामाचा माणूस’ म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला, असे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण आपण छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून जतन करण्याचा एक भावपूर्ण उपक्रम हाती घेत आहोत.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ आदरणीय दादांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात अहोरात्र परिश्रम घेतले. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणारी त्यांची कामाची धडपड रात्री उशिरापर्यंत अखंड सुरू असायची. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते. विकासासाठीची तळमळ आणि जनतेसाठीची बांधिलकी… या प्रत्येक क्षणाला इतिहासात स्थान मिळावे, हीच या प्रकल्पामागील भावना आहे.

आदरणीय दादांच्या कार्यकर्त्यांकडे, सहकाऱ्यांकडे, स्नेहीजनांकडे व मित्रमंडळींकडे त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक अनमोल क्षण छायाचित्रे किंवा चित्रफितींच्या स्वरूपात जतन झालेले असतील. आपणाकडे उपलब्ध असलेली अशी छायाचित्रे व व्हिडिओ (एचडी गुणवत्तेत) कृपया आम्हाला पाठवावीत, ही नम्र विनंती. यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी ourdada@viitindia. Org आणि भ्रमणध्वनी क्रमांक ८८७९८८७००९ (श्री. अभिषेक) उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे आदरणीय दादांच्या कार्याचा समृद्ध दस्तऐवज तयार होईल. राज्यातील तसेच राज्याबाहेरील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पोहोचावा, यासाठी आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

चला, आपण सर्वजण मिळून आदरणीय दादांच्या आठवणी जतन करूया आणि त्यांच्या स्मृतींना चिरकाल जिवंत ठेवूया.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *