खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी संपन्न

Spread the love

तुळजापूर : मंगळवार, दि.३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर येथे परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आले. ग्रहणकाळात देवींस विधीवत स्नान घालून श्वेत वस्त्र परिधान करून सोवळ्यात ठेवण्यात आले.ग्रहणकाल संपल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने देवीची सिंहासन पूजा, पंचामृत स्नान, शुद्धस्नान,आरती तसेच धुपारती हे दैनंदिन धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.चंद्रग्रहणाच्या काळात मंदिरातील धार्मिक परंपरा काटेकोरपणे पाळल्या जात असून,भाविकांमध्येही या विधींबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. मंदिर परिसरात शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असतात. ग्रहणकाळातील विशेष विधींमुळे भाविकांमध्ये आध्यात्मिक वातावरण अधिकच दाटून आले होते.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *