श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

Spread the love

धाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते श्री आई तुळजाभवानी मातेस विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा व ओटी भरण्यात आली.
याप्रसंगी श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. श्री महेश कनकदंडे व सौ. मोहिनीताई कनकदंडे यांनी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.


या पवित्र प्रसंगी श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने परमपूज्य स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी डोलीची विशेष व्यवस्था करण्यात आली. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने स्वामी महाराजांचा तसेच ॲड. श्री महेश कनकदंडे व सौ. मोहिनीताई कनकदंडे यांचा श्री देवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

  • Related Posts

    राजमाता जिजाऊंचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी घेतले सपरिवार तुळजाभवानीचे दर्शन……

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर:- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे वडील, शूरवीर सरदार लखोजीराजे जाधवराव यांचे १४ वे वंशज राजे अमरसिंह जाधवराव यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह कुलदेवी श्री…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *