श्री आई तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी

Spread the love

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने देवीची विशेष पूजा करून पारंपरिक पद्धतीने देवीला रंग अर्पण करण्यात आले.

सकाळी अभिषेक पूजनानंतर श्री तुळजाभवानी मातेला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला. त्यानंतर त्या पांढऱ्या शालूवर सप्तरंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. महंत व पुजाऱ्यांनी देवीला रंग लावून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला.

रंगपंचमीच्या दिवशी देवीची विशेष पूजा करून तिला रंग लावण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यानंतर पुजारी व भाविक एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त करतात. या उत्सवात प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येतो.

यावेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, पुजारी बांधव तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *