श्री आई तुळजाभवानी मंदिरात हुताशनी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक होलिकादहन उत्साहात.

Spread the love

तुळजापूर : हुताशनी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होलिकादहनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंदिर परिसरातील होमकुंडासमोर विधीवत होळी पूजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.

श्री आई तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडासमोर होळीचे पूजन झाल्यानंतरच तुळजापूर शहरात घरोघरी होळी पूजन करण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार मंदिरातील होळी पूजनानंतर शहरभर होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.

हुताशनी पौर्णिमेनिमित्त मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. सायंकाळची अभिषेक पूजा सायंकाळी ६ वाजता पार पडली. अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी देवींची आरती व धुपारती करण्यात आली.

या प्रसंगी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, संगणक अभियंता सुधीर कदम, सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांच्यासह मंदिरातील कर्मचारी, पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    श्री आई तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *