विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे आवाहन

Spread the love

लातूर : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, अनोळखी लिंक उघडू नका, संशयास्पद फोन कॉल्स किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. कारण, यातून तुमची फसवणूक होऊ शकते. विद्यार्थ्यांनी जागरूक राहून जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले.
येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात सायबर क्राईम, महिला सुरक्षा आणि व्यसनमुक्ती या विषयांवर मार्गदर्शन करत गुरुवारी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, उपप्राचार्य प्रा. कविता केंद्रे, संस्थेच्या संचालक अश्‍विनी केंद्रे, संचालक स्वाती घुले यांच्यासह एस. एम. गुरमे, मदन धुमाळ, ए. बी. मुंडे, सुधाकर लोहकरे, शिवकांत वाडीकर, विष्णू कराड, परमेश्‍वर गित्ते यांची उपस्थिती होती.
लातूर हे शैक्षणिक गुणवत्तेचे माहेरघर बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लातूर पोलीस तत्पर आहेत. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात जिद्द आणि चिकाटी बाळगून यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन समन्वयक राजीव मुंढे यांनी केले तर आभार के. आर. नवगरे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    तुळजापुर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – तुळजापुर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन रविवार,६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या शुभहस्ते या…

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *