हॉर्ट अटॅकचं निदान करणारं अनोखं ईसीजी जॅकेट ला पेटंट प्रदान सोलापुरातील डॉक्टरांचं संशोधन

Spread the love

सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे. त्यास नुकतेच पेटंट मिळाले आहे.
हृदयरोगाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे अगदी तरुणवयातील व्यक्तींमध्ये देखील हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी हॉर्ट अटॅकचे निदान करणाऱ्या अनोख्या उपकरणाचे संशोधन केले आहे. हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान होणे हे देखील प्रमुख कारण आहे. हृदयरोगाचे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ईसीजी (ECG). मात्र गाव-खेड्यात ईसजी मशीन देखील उपलब्ध नसतात.

अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे डॉ. गुरुनाथ परळे यांनी अनोख्या जॅकेटचे संशोधन केले आहे. हे जॅकेट रुग्णाने परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवता येणार आहे. सध्या बाजारात अनेक उत्पादन असून ते फक्त हृदयाचे ठोके मोजणे किंवा अनियमितता दाखवणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे.

हार्ट अटॅकचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारा 12 LEAD ECG फक्त या उपकरणाद्वारे शक्य असल्याचा दावा डॉ. परळे यांनी केला आहे. वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर ह्या उपक्रमास नुकतेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले असल्याचे डॉ. गुरुनाथ परळे यांनी माहिती दिली. हृदय रुग्णांसाठी हा जॅकेट दिलासादायक ठरणार आहे.

1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर पॉईंट्स शोधण्यात आले

सध्याचे जर ईसीजी मशीन आपण पाहिले तर त्यामध्ये 12 पॉईंट हे रुग्णांना घरी कनेक्ट करणे शक्य नाही. किंवा चुकीचे कनेक्ट झाले तर डायग्नोसिस चुकीचे होऊ शकते. साधारणत: ईसीजी करताना छाती, हात आणि पायांवर देखील पॉईंट्स असतात या जॅकेटची निर्मिती करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच होता. त्यामुळे छाती आणि पोटावर असे पॉईंट्स अपेक्षित होते. ज्याद्वारे निघणारा ईसीजी हा नेहमीच्या ईसीजी सारखाच असावा. जवळपास 1300 रुग्णांचा अभ्यास करून छाती आणि पोटावर असे पॉईंट्स शोधण्यात आले. 2020 मध्ये शिकागो येथे झालेल्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डीओलॉजी इन अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॉजी कॉन्फरन्स मध्ये मांडण्यात आले. यासोबतच विविध अभ्यासांद्वारे हे पॉईंट्स नेहमीच्या ईसीजी पॉईंट्स सारखेचं असल्याचे सिद्ध केले. ही ह्या जॅकेट निर्मितीची पहिली पायरी होती’ अशी माहिती डॉ. गुरुनाथ परळे यांनी दिली.

खेडेगावांपर्यंत उपकरण पोहोचवायचे आहे

‘माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय अनुभवानुसार अनेक रुग्णांना छातीत दुखल्यानंतर केवळ ईसीजी वेळेत झाला नाही किंवा ईसीजी व्यवस्थित इंटरप्रिएट करता आला नाही, त्यामुळे जीव गमवावा लागलाय. यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे मला असे वाटले की रुग्णांना जर घरी ईसीजी करता आला तर मदत होऊ शकते या संकल्पनेतून या जॅकेटची निर्मिती करण्यात आली आहे. विशेषता खेडेगावांपर्यंत हे उपकरण पोहोचवायचे आहे. साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत हे जॅकेट रुग्णांना उपलब्ध होईल असे आम्हाला अपेक्षित आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. गुरुनाथ परळे यांनी दिली.

ह्या प्रकल्पासाठी अश्विनी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल सह सी सी यू 2 विभाग व स्पंदन चा स्टाफ व हायन हेल्थ कंपनी चे श्री प्रशांत सदावर्ते व श्रीराम कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे डॉ. गुरुनाथ परळे यांनी सांगितले.

  • Related Posts

    पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा

    Spread the love

    Spread the loveसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आयुर्वेदीक महाविद्यालय लगत पाठीमागे ५०० खाटांच्या नवीन अद्यावत जिल्हा रुग्णालयास महायुती सरकारने मंजुरी दिली होती. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता…

    स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात आरोग्य तपासणी व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. 17 जुलै, 2025 रोजी तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह संलग्न शाळा, विमानतळ रोड, अळणी, ता. जि. धाराशिव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *