आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश आरोग्य विभागाचे उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love

धाराशिव – : आरोग्य सेवक (पुरुष) या पदासाठी बनावट नियुक्ती आदेश देऊन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून,यासंदर्भात एका वृत्तपत्रात दिनांक ०४.०२.२०२६ रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे.या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरोग्य विभागाच्या खोट्या लेटरपॅडचा वापर करून,संगणकाच्या सहाय्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या खोट्या व बनावट सह्या एडिट केल्या आहेत.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या स्वाक्षरीचे असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे रिक्त पदावर रुपये २९,२०० ते ९२,३०० या वेतनश्रेणीत नियुक्ती आदेश दिल्याचे दिसून आले आहे. या बनावट आदेशांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसारित झाले आहे.

जिल्हा परिषद,धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन-२०२३ साठी जाहिरात क्र. १/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ च्या अनुषंगाने विविध संवर्गातील एकूण ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के व आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी IBPS,मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीअंती अंतिम निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या आदेशांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा परिषद व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून,त्याचे आवलोकन करावे.कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये.तसेच अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.आरोग्य विभाग अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणाचे समर्थन करीत नाही.या फसवणुकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असण्याची दाट शक्यता असून,त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाची नाहक बदनामी झाली आहे.

तरी या प्रकरणाची सविस्तर पोलिस चौकशी करून,उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी,असे निवेदन आरोग्य विभागाकडून पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना देण्यात आले आहे.


  • Related Posts

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    ‘काचबिंदू’विषयी जनजागृती अत्यावश्यक ; वेळोवेळी तपासणी केल्यास अंधत्व टाळता येते. डॉ.धनंजय चाकुरकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराची लक्षणे सहसा सहज ओळखता येत नसल्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन योग्य वेळी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *