शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा

Spread the love

धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेनेची वाटचाल सामाजिक बांधिलकी जोपासत आजही मोठ्या जोमाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव शहरातील तांबरी विभाग येथील नगर परिषद शाळा क्र. 21 येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रवीण कोकाटे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, मा. नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, सिद्धेश्वर कोळी, पंकज पाटील,युवासेना तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी, शहरप्रमुख अभिराज कदम, शौकत कुरेशी, सुमित बागल, मनोज पडवळ, अमित उंबरे, मनोज उंबरे, प्रताप शेंडगे, वाहतूक सेनेचे सुनील वाघ, पिंटू आंबेकर, संकेत सुर्यवंशी, शहाजी पवार, अंकुश चौगुले, पांडू भोसले, महेश लिमये, प्रसाद राजेनिंबाळकर, प्रवीण केसकर, संजय भोरे, राज निकम, प्रदीप साळुंके, अक्षय खळदकर, अबरार कुरेशी, मिलिंद पेठे, सतीश लोंढे, पंकज पडवळ यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि रणसम्राट प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती खालावली; पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू

    Spread the love

    Spread the loveपुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे शनिवारी सायंकाळी त्यांना…

    नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे?’, अंबादास दानवेंची टीका

    Spread the love

    Spread the loveविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नितेश राणे यांच्या विधानाचा समाचार घेत नारायण राणे असताना देवेंद्र फडणवीस हे त्यांचे बाप कसे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *