जिल्ह्यात ५० लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्पएकाच दिवशी करण्यात येणार १५ लक्ष वृक्षांचे रोपण

Spread the love

वृक्ष लागवडीच्या समन्वयासाठी विविध समित्या व पथकांची नेमणूक

धाराशिव – यंदाच्या सन २०२५ च्या पावसाळ्यात जिल्ह्यात ५० लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.यामध्ये जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायती व १० नगरपालिका क्षेत्रांमधून लोकसहभागातून एकाच दिवशी १५ लक्षांहून अधिक वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन करण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून,यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विविध समित्या व पथकांची स्थापना करण्यात आली आहे.या समित्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून,त्यांनी रोपण कालावधीत नेमून दिलेली कामे विहित वेळेत पार पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी दिले आहेत.

यामध्ये जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर,विभागीय वन अधिकारी,(प्रादेशिक) बी.ए.पोळ,विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण) व्ही.ए.करे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने हे असणार आहेत.

वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन सनियंत्रण अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे असणार आहेत.

वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तालुकास्तरीय (शहरी भाग वळून) नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये धाराशिव ग्रामीणसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन,मांजरा प्रकल्प) उदयसिंह भोसले,तुळजापूर ग्रामीणसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी देवदत्त गिरी, उमरगा ग्रामीणसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्याम गोडभरले,भूम ग्रामीणसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( नरेगा) आनंद मिरगणे,लोहारा ग्रामीणसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मध्यम प्रकल्प,परंडा ग्रामीणसाठी प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन ) मनोज राऊत,कळंब ग्रामीणसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,वाशी ग्रामीणसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सूर्यकांत भुजबळ तर नगरपालिका व नगरपंचायत स्तरीय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये धाराशिव नगर पालिकेसाठी धाराशिव उपविभागीय अधिकारी श्री ओंकार देशमुख,तुळजापूर न.प.साठी जि.प चे कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, उमरगा नपसाठी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी गणेश पवार,भूम नपसाठी उपविभागीय अधिकारी भूम वैशाली पाटील,वाशी नगरपंचायतसाठी कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील, परंडा नपसाठी उपविभागीय कृषी अधिकारी,भूम श्री.विवेक गुडूप लोहारा नगर पंचायतसाठी धाराशिव उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर,कळंब नपसाठी कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,नळदुर्ग नपसाठी जिल्हा सह. आयुक्त( नगर विकास प्रशासन) अजित डोके धाराशिव यांची तर मुरूम नगर पंचायतसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (संजय गांधी) ज्योती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुकास्तरीय (शहरी भाग वगळून) सहाय्यक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.धाराशिव,तुळजापूर, भूम,कळंब,उमरगा,लोहारा,वाशी,परंडा यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे काम पाहणार आहेत.तर नगरपालिका व नगरपंचायत स्तरीय नोडल अधिकारी म्हणून संबंधित नगरपालीका व नगरपंचायतची मुख्यधिकारी काम पाहणार आहेत.

वृक्षारोपणासाठी वन क्षेत्रपाल बी.एम. तळेकर व वनपाल शहाजी देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. वृक्षारोपणासाठी साहित्याचा पुरवठा करणारे पथकाचीही नेमणूक करण्यात आली असून यामध्ये धाराशिव वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पचरंडे व भुमचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) श्री.कुटे हे आवश्यकतेनुसार साहित्याचा पुरवठा करणार आहे.यामध्ये प्रचार प्रसिद्धीचे काम जिल्हा माहिती अधिकारी व विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण) धाराशिव यांच्याकडे असणार आहे.वृक्षारोपण स्थळांची लागवड पूर्व कामे (मशागत) पथक यामध्ये प्रकल्प संचालक (आत्मा) श्री.व्ही.एन.मिसाळ यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली असून यामध्ये विभागीय वनाधिकारी प्रादेशिक,विभागीय पदाधिकारी सामाजिक वनीकरण,कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी,कार्यकारी अभियंता यांत्रिकी पाटबंधारे विभाग,जिल्हा मृद सर्व्हेक्षण चाचणी अधिकारी धाराशिव यांचा समावेश आहे.वृक्षारोपण स्थळ निश्चिती करणारे पथकाचीही नेमणूक करण्यात आली असून भूम,कळंब,लोहारा,उमरगा,धाराशिव, परंडा,तुळजापूर व वाशी या तालुक्यांसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी हे काम पाहणार आहेत.तहसीलदार गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित तालुक्यातील गावे वाटून देण्यात आले आहेत.

वृक्षारोपन स्थळ निश्चिती करण्यासाठी अधिनास्थ तलाठी,मंडल अधिकारी, ग्रामसेवक कृषी सहायक यांची मदत घेऊन सदरची माहिती Epicollect- ५ ह्या सर्व्हेक्षण अॅपमध्ये माहिती भरण्यात यावी,

वृक्षारोपण स्थळे सिंचन व्यवस्थापकामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद धाराशिव,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद,धाराशिव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,धाराशिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या पथकाकडे वृक्षारोपणानंतर सिंचन व्यवस्था करणे हे प्रामुख्याने काम असणार आहे.

विद्यार्थी व शिक्षक पथक (स्टुडन्ट क्लबची) ही नेमणूक करण्यात आली असून या पथकामध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अक्षयवट पथक (वड),अश्वस्थ पथक (पिंपळ), अरिस्ता पथक (कडुनिंब),औदूंबर पथक (उंबर),पलाश पथक (पळस) आदी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सिंचन व्यवस्थापन पथकाने जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी यांची नमूद नावांची साप्ताहिक गट तयार करून वृक्षारोपण करण्यात आलेल्या रोपांना सिंचन करणे,प्रत्येक ग्रामपंचायत नुसार रोपन करण्यात आलेल्या रोपांना पावसाळा संपल्यानंतर दहा विद्यार्थी व दोन शिक्षक याप्रमाणे चार आठवड्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून पाणी देणे असे प्रामुख्याने कामे असणार आहेत. मनुष्यबळ व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली असून जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे पथक प्रमुख असतील. तहसीलदार (महसूल) अभिजित जगताप,राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नायब तहसीलदार (रोहयो),सचिन पाटील हे असतील.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंदणी ते वृक्षारोपण दिवशीपर्यंतचे सर्व कामकाज पाहण्याची जबाबदारी विभागीय वन अधिकारी(सामाजिक वनीकरण) व्ही.के.करे,तहसीलदार (महसूल) अभिजित जगताप,नायब तहसीलदार (रोहयो) कांचन जाधव ह्या असतील.

प्रचार प्रसिद्धी समितीमध्ये पथक प्रमुख – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,सहपथक प्रमुख – निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व सदस्य शिक्षणाधिकारी(माध्यमिक) सुधा साळुंके,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे हे असतील.या समितीकडे प्रभात फेऱ्यांचे आयोजन करणे,विविध स्पर्धा आयोजित करणे,रोपवन स्थळांच्या ठिकाणी सेल्फी पॉईंटची व्यवस्था करणे,पोस्टर्स बॅनर्सच्या माध्यमातून वृक्षलागवड मोहिमेची प्रसिद्धी करणे स्वयंसेवकांना टी शर्ट व कॅप उपलब्ध करुन देणे ही कामे सोपविण्यात आली आहे.

  • Related Posts

    एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही

    Spread the love

    Spread the loveराज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *