राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

मुंबई: राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा गुणगौरव शासनामार्फत करण्यात येतो. राज्याचे युवा धोरण अंतर्गत राज्य युवा पुरस्कार शासनामार्फत देण्यात येतो. या पुरस्कारासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील  १ युवक, १ युवती  व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप युवक-युवती यांना रोख रुपये ५० हजार व संस्थेस १ लाख तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवक पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. १५ फेब्रुवारी, २०२५ रोजी कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रत, आवश्यक छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली), तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसर, समता नगर, कांदिवली, मुंबई येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या कमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा या संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *