धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

Spread the love

धाराशिव –  महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

अस्थिव्यंग प्रवर्गातील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकूण ३१ पदके पटकावली.एक निवासी अपंग शाळा,सास्तूर येथील विद्यार्थ्यांनी १३ सुवर्ण,६ रजत आणि ४ कांस्य अशी एकूण २३ पदके मिळवली.ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र,बेंबळी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि ६ रजत पदके मिळवली,तर नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र,खानापूर येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक पटकावले.

मतिमंद प्रवर्गातही जिल्ह्याने उज्ज्वल कामगिरी केली.स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह/शाळा,आळणी येथील विद्यार्थ्यांनी ११ सुवर्ण,३ रजत आणि १ कांस्य अशी एकूण १५ पदके मिळवली.

तुळजाभवानी मतिमंद मुलांची बालगृह/शाळा,एकुरगावाडी येथील विद्यार्थ्यांनी १ सुवर्ण आणि २ रजत पदके पटकावली. सिद्धाराम म्हेत्रे मतिमंद निवासी शाळा, आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ३ सुवर्ण आणि २ रजत पदके जिंकली.एकूण ५४ पदकांची कमाई करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विजयी खेळाडूंचे व शाळेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.सुनील खामितकर यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the love मुंबई –: राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *