शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला ‘सुश्रुती २०२५’इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड

Spread the love

धाराशिव – पुणे येथे आयोजित सुश्रुती २०२५ इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाने उत्तुंग कामगिरी करत बेस्ट इन्स्टिट्यूशनल अवॉर्ड पटकावला आहे.

२१ ते २३ नोव्हेंबर रोजी निमा ओबीजीवाय सेंट्रल यांच्या वतीने डॉ. डी.वाय.पाटील कॉलेज,पुणे येथे ही भव्य परिषद पार पडली.देशभरातील २७ संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये धाराशिवच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाने तिसरा क्रमांक पटकावत हा मानाचा बहुमान मिळवला.

हे यश महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.वीणा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच स्त्रीरोग व प्रसूति तंत्र विभागाचे डॉ.अगावणे,डॉ.बालाजी लोमटे आणि डॉ.श्वेता पोतदार यांच्या मार्गदर्शनात साध्य झाले.

प्रसूति तंत्र व स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहकार्यही या यशात मोलाचे ठरले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि स्मिता जाधव उपस्थित होत्या.त्यांनी विजेत्या टीमला ट्रॉफी आणि सन्मानपत्र प्रदान करून महाविद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक केले.यावेळी डी.वाय.पाटील कॉलेजचे प्राचार्य प्रशांत खाडे तसेच डॉ.पी.डी.पाटील,डॉ.शांतीलाल शर्मा, डॉ.प्रदीप मुसळे,डॉ.हेर्लेकर,डॉ. श्रीमती.तावरे आणि डॉ.सुर्यकर उपस्थित होते.


  • Related Posts

    धाराशिव जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान– खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर .               

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार”…

    पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

    Spread the love

    Spread the loveधाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *