
नळदुर्ग (प्रतिनिधी) – परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता- तुळजापूर जी- धाराशिव आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाचे आयोजन नळदुर्ग येथील आपल घर प्रकल्पमध्ये करण्यात आले होते. दिनांक 02/02/2025 वार रविवार.या कार्यक्रमाचे अध्यक्ष – पन्नालाल भाऊ सुराणा ( ज्येष्ठ समाजवादी विचारवंत ) , प्रमुख मार्गदर्शक. मा. प्रा. डॉ. सुरेश वाघमारे ( ज्येष्ठ विचारवंत लातूर ), प्रमुख पाहुणे – मिलिंद वाकोडे, ऍड तृप्ती भोसले, मा. राजा सोनकांबळे, मा दत्तात्रय लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव.श्री मारुती बनसोडे यांनी केले.. संविधान बचाव या विषयावर डॉ सुरेश वाघमारे यांनी विचार मांडले ,या कार्यक्रमात एकूण 21 पुरस्कार वितरित करण्यात आले होते यावेळी श्री भैरवनाथ सामाजिक संस्था चे अध्यक्ष श्री गणेश नावडे सर यांना शैक्षणिक व सामाजिक आदर्श कार्याबद्दल राज्यस्तरीय परिवर्तन आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला 200 ते 250 अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदक श्री भैरवनाथ कानडे सर यांनी केले.