कल्याणस्वामी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा असे केल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत   कार्यक्रम घेऊन कल्याण स्वामींची प्रतिमा व दासबोध ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली.

Spread the love

परंडा – महाराष्ट्र शासनाने परंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव कल्याणस्वामी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा असे केल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत   कार्यक्रम घेऊन कल्याण स्वामींची प्रतिमा व दासबोध ग्रंथाची प्रत भेट देण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेना स्थानिक महापुरुषांची नावे देऊन त्या महापुरुषांचा एकप्रकारे गौरवच केलेला आहे त्याच हेतूने त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य व ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परंडा नगरीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस  कल्याणस्वामी महाराज हे नाव देऊन महाराष्ट्र सरकारने एक प्रकारे गौरवच केला आहे.

त्या संदर्भात कल्याण स्वामी मठ डोमगाव येथील मठपती डाॅ. संजयकुमार जहागीरदार, परंडा येथील मठपती पुरुषोत्तम वैद्य यांचे चिरंजीव नागेश वैद्य, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विकासराव कुलकर्णी, लक्ष्मण गोरे, सारंग खंडागळे, विशाल काशिद व शहाजी चौधरी यांनी औद्योगिक प्रशिक्षण येथे जाऊन एक छोटेखाणी कार्यक्रम घेतला व प्राचार्य कदम सरांना कल्याणस्वामींची प्रतिमा व दासबोध ग्रंथ भेट दिला.

तसेच डॉ संजय जहागीरदार यांनी कल्याण स्वामींचे चरित्र सांगितले, विकासराव कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील येथील सर्व स्टाफ व प्राशिक्षनार्थी उपस्थित होते. प्राचार्य कदम सर यांनी प्रास्ताविक केले व फाळके सरांनी आभार प्रदर्शन केले

  • Related Posts

    हैद्राबाद येथील भाविक पद्मप्रिया सतीश गौड यांच्याकडून श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण

    Spread the love

    Spread the loveश्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा…

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *