श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव भक्तीभावात संपन्नहजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Spread the love

श्रीशैल गवंडी, दि. ०२/०२/२६ (अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली.

सकाळी ८:३० वाजता प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११:३० वाजता श्रींना महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दिवसभर दुपारी १ ते ३ या वेळेतही मोठ्या संख्येने भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे यासाठी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी विशेष प्रयत्नशील होते.

सायंकाळी ५ वाजता सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात पुरोहित मंदार महाराज, व्यंकटेश पुजारी व मोहित महाराज यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली. देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला.

ही पालखी मिरवणूक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ मार्गे विविध गल्लींतून फिरत रात्री साडे नऊ वाजता वटवृक्ष मंदिरात पोहोचली. त्यानंतर गुरु भजन झाले व सर्व भाविकांना शिरा प्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

या वेळी मंदिर समितीचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी व असंख्य स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : पालखी मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अमोलराजे भोसले, मंदार महाराज पुजारी व अन्य मान्यवर उपस्थित दिसत आहेत.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *