धाराशिवच्या युवा संशोधकाचा,पंतप्रधानांकडून गौरव

Spread the love

धाराशिव – नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘At Home Reception’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिवचे युवा संशोधक व दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ.शुभम धूत यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.

आयुर्वेद क्षेत्रात अभिनव संशोधन करणारे डॉ.धूत यांनी हिमोफिलिया या दुर्धर आजारावर जगातील पहिले आयुर्वेदिक औषध ‘रक्तामृत वटी’ विकसित केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्वोच्च नेतृत्वाकडून मिळालेला हा सन्मान केवळ डॉ.धूत यांचाच नव्हे,तर संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.हा गौरव भावी वैज्ञानिक संशोधन व प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल.

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *