
धाराशिव — माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात “मदत नव्हे, कर्तव्य!” या संकल्पनेतून शिवसेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात, तानाजी सरपाळे यांच्या लॉंड्री दुकानाचे पुनर्वसन करण्यात आले. तसेच शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झालेल्या नेताजी धोंगडे यांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत देण्यात आली.
“८०% समाजकारण, २०% राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वाचा प्रत्यय देणारा उपक्रम शिवसैनिकांनी उभारला.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव,युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे व अनेक पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.