
धाराशिव – मेरा युवा भारत केंद्र धाराशिव व जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव व ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक:- 18/07/2025 रोजी एक पेड माँ के नाम वृक्षारोपण अभियान घेण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमात कार्यक्रम अध्यक्ष श्री अरविंद पवार (तलाठी देवळाली) ,प्रमुख पाहुणे श्री आनंद जाधव (कृषी सहाय्यक मेडशिंगा)श्री रमण आगळे ,श्रीमती केनेकर एस एच (ग्रामसेवक देवळाली), श्री तीर्थकर पी.जी (कृषी सहाय्यक )श्रीमती ढेकणे पी.पी (ग्रामसेवक मेडसिंगा) श्री शिंदे अजित, श्रीमती रुक्मिणी विश्वनाथ (सपकाळ सरपंच देवळाली) श्री अण्णा दूधभाते (सरपंच मेडसिंगा) श्री किशोर साळुंखे ,श्री विनोद आगळे, श्री हरिभाऊ भिंगडे व इत्यादी पाहुणे उपस्थित होते.
या वृक्ष लागवडीसाठी धीरूभाई अंबानी विद्यालय ,धाराशिव येथील 100 विद्यार्थी आले होते व जयप्रकाश विद्यालय रुईभर येथील 100 विद्यार्थी आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळाली येथील 100 विद्यार्थी आले होते व मेरा युवा भारत कार्यालयाचे वैभव लांडगे व विवेकानंद युवा मंडळ मेडसिंग व विवेकानंद युवा मंडळ देवळाली मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते व देवळाली येथील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका ,ग्रामस्थ व मेडसिंगा येथील ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .हा वृक्षारोपण कार्यक्रम स्मशानभूमी परिसर देवळाली येथे 3300 वृक्ष लागवड करण्यात आले .