
धाराशिव -: आज मुस्लिम समाजाचा पवित्र सण बकरी (ईद-उल-अजहा) उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली आणि शांती व समानतेचा संदेश दिला.
दरवर्षीप्रमाणे नमाज पठण झाल्यानंतर शहरासह जिल्ह्यातील विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर ये येऊन मुस्लिम समाज बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. ही मागील अनेक वर्षांची परंपरा आहे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने मंडप, खुर्च्या आणि टेबल्स आदिंची व्यवस्था केली जाते.
यावर्षी मात्र ही परंपरा खंडित झाल्याचे दिसून आले. ना एकही प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहिला, ना प्रशासनाकडून कोणतीही अधिकाऱ्याने उपस्थिती दाखवली गेली. काही लोकप्रतिनिधींनी मात्र नमाज झाल्यानंतर, गर्दी सुटल्यावर, शेवटी दर्ग्यावर जाऊन शुभेच्छा दिल्याचे समजते.
सर्व प्रमुख राजकीय पक्ष हे राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून आपापल्या सोयीनुसार प्रत्येक समाजाचा योग्य असा वापर करून घेतात याचाच प्रत्यय आज अनुभवास मिळाला सध्याच्या घडीला कुठलीही निवडणूक नसल्याने राजकीय नेत्यांनी याकडे पाठपुराचेही बोलले जात आहे.
यामुळे मुस्लिम समाजात नाराजीचा सूर उमटत आहे. काही राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या ठराविक मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना ही आपल्या नेत्यांना ईदगाहवर उपस्थित राहण्यासाठी बोलावावे कीव यावे लागेल असे बोलण्याचे धाडस झाले नाही याचीही चर्चा रंगली आहे. परिणामी, अनेक मुस्लिम नागरिकांनी समाजाबाबतचा सौहार्दाचा दृष्टिकोन गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.