
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र भाजपा कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मोदी सरकारच्या यशस्वी ११ वर्षांनिमित्त “संकल्प से सिद्धी तक” ही विशेष कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत धाराशिव जिल्हा भाजपा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपली उपस्थिती नोंदवली.
धाराशिव जिल्हाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीनंतर कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दादा दानवे, डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, सौ. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी धाराशिव जिल्ह्यातील नव-नियुक्त मंडल अध्यक्ष तसेच विविध मान्यवर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.