
धाराशिव : जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद तथा ईद उल फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला.
शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना मिठी मारून ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शांततेत आणि सलोख्यात पार पडलेल्या या सणानिमित्त संपूर्ण शहरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्यावतीने योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.