धाराशिव ( प्रतिनिधी ) – शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
शासन निर्णय दि. ०७ ऑक्टोबर २०१५ मधील विहीत निकषांनुसार ही योजना सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे.सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील मदरसांनी शासन शुध्दीपत्रक २१ ऑगस्ट २०२४ मधील तरतूदीनुसार शुद्ध पेयजल व अखंडित वीज पुरवठ्यासाठी इन्व्हर्टर (Water Purifier व Solar Base Inverter) यासाठी अनुदान प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्याकडे शासन निर्णयानुसार विहीत नमुन्यात सादर करावेत.
शासन परिपत्रक १९ जुलै २०२४ नुसार,यापूर्वी शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव १३ फेब्रुवारी २०२५ अन्वये रद्द करण्यात आले असून,सुधारित प्रस्ताव नव्याने मागविण्यात येत आहेत.
इच्छुक शाळांकडून २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे.विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अनुदानासाठी प्रस्ताव सादर करताना अल्पसंख्याक शाळांनी त्यांचे प्रस्ताव विहीत मुदतीत व विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील जिल्हा नियोजन कार्यालय येथे संपर्क साधावा.