रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अँड.व्यंकटराव गुंड“महाराष्ट्राचा अभिमान,उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानित

Spread the love

नाशिक – रुपामाता समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांना ग्रामीण भागात उद्योग, कृषि, दुग्धव्यवसाय, बँकिंग, शैक्षणिक, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल नाशिक येथे रिसील डॉट इन व समाचार वाणी यांच्यातर्फे “महाराष्ट्राचा अभिमान, उद्योगांचा सन्मान-महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानित केले. नाशिक येथे पार पाडलेल्या कार्यक्रमास मा.संजय हजारी चीफ जनरल मॅनेजर अमिनेशन फॅक्टरी खडकी, पुणे, प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, मा.अभय दफ्तरदार असिस्टंट डायरेक्टर एमएसएमई, मा.सतीश कल्याणकर,एमडी वेदांत इन्फोटेक, मा.अमलेश त्रिपाठी झोनल मॅनेजर युको बँक, डॉ. चेतन सिंग राजपूत असिस्टंट कमिशनर जीएसटी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इत्यादि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी फिल्म अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते हा पुरस्कार गुंड यांनी स्वीकारला या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातील विविध उद्योजक उपस्थित होते.
आपल्या दूरदर्शीपणाने रुपामाता उद्योग समूहाला उच्चपूर्ण महाराष्ट्रभर पोचवणारे अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. रूपामाता उद्योगसमूहाने धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात उद्योगीक, कृषी, औद्योगिक, बँकिंग, दुग्धव्यवसायाद्वारे शेतकर्यांना उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून दिले असून, युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. या पुरस्कारामुळे अधिकाधिक उद्योजकांना प्रेरणा मिळणार असून, जिल्हयातील उद्योगांना नवी ओळख मिळणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुंड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला मनस्वी आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण रुपामाता परिवार, शेतकरी, बँकेचे खातेदार, माझे हितचिंतक, उद्योजक, सहकारी मित्र परिवार यांचा गौरव आहे व या सर्वांचा कायम ऋणि आहे.

  • Related Posts

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट यश

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाच्या विद्यमाने नागपूर येथे २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *