राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराचे मानकरी ठरले पत्रकार आयुब शेख

Spread the love

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गचे पत्रकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील विविध विषयाला हाताळत, गरजू व पीडितांचा आधार बनून आपल्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडनारा पत्रकार आयुब शेख यांच्याकडे पाहिले जाते.
सामाज प्रबोधन व परिवर्तनसाठीचे आपले अतुलनिय कार्य समाजाला एका वेगळ्या उंचीपर्यंत घेवून जाईल याचा आम्हास विश्वास आहे. आपल्या या पत्रकारिता क्षेत्रातील अविरत सेवावृत्तीचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या वतीने आपणांस राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार व सन्मानपन्न देवून सन्मानित करीत आहोत असे जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी अयुब शेख यांना पुरस्कार प्रदान करताना म्हणाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड बाबासाहेब वडवे, अॅड. रामचंद्र ढवळे, मारुती बनसोडे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आपलं घर प्रकल्प आलियाबाद या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पन्नालाल भाऊ सुराणा होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. सुरेश वाघमारे,डॉ. मिलिद वाकोडे पुणे (रो नि मुख्य कार्यकारी अधिकारी खादी कामोधो भारत सरकार) मा. अॅड. मैना (तृप्ती) भोसले  सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल कल्याण समिती धाराशिव. दत्तात्रय लांडगे उपजिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सदाशिव मा. प्रा. राजा सोनकांबळे एसएनडीटी महिला जुनिअर कॉलेज पुणे तसेच अनेक पुरस्कार मानकरी प्रतिष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    धाराशिव जनतेच्या आशीर्वादामुळे उत्कृष्ट खासदार पुरस्कार मिळण्याचा मान– खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर .               

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते स्व. आमदार माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार”…

    पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

    Spread the love

    Spread the loveधाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *