
सातारा (वाई) – चतुर्थीच्या पवित्र दिवशी महागणपतीच्या कृपेने पावन झालेल्या वाई मधिल शहबाग येथील स्ट्रॉबेरी फॉर्ममध्ये निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार अनुभवायला मिळाला आहे. सुहास राजाराम अनपट यांच्या स्ट्रॉबेरी फॉर्ममध्ये चक्क गणपतीच्या आकाराची स्ट्रॉबेरी सापडल्याने आनंदाचे वातावरण आहे. चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण नेहमीच उत्सुक असतात. परंतु, निसर्गाने स्वतः गणपतीच्या स्वरूपात दर्शन दिल्याने हा अनुभव अत्यंत भावनिक ठरला आहे. स्ट्रॉबेरीचा आकार अगदी श्री गणेशाच्या मूर्तीप्रमाणे दिसत असल्याने हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
“गणपतीची कृपा आमच्यावर सदैव आहेच. आणि चतुर्थीच्या दिवशी असा अनुभव मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत,” असे सुहास अनपट यांनी आनंद व्यक्त करत सांगितले.निसर्गाची ही लीला आणि गणेशाच्या कृपेचा अनुभव खरंच विस्मयकारक आहे!