जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

Spread the love

धाराशिव – सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव जिल्ह्यासाठी ८४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटर केरोसिनचे तालुकानिहाय वाटप अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांसाठी सर्वसाधारण प्रमाणात निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार धाराशिव तालुक्यास २० हजार लिटर, तुळजापूरला ११ हजार लिटर, लोहारा ७ हजार लिटर, उमरगा १३ हजार लिटर,परंडा ९ हजार लिटर,भूम ८ हजार लिटर, कळंब ११ हजार लिटर आणि वाशी तालुक्यास ५ हजार लिटर केरोसिनचे नियतन देण्यात आले आहे.

दरम्यान,मंजूर करण्यात आलेल्या ८४ हजार लिटरपैकी १२ हजार लिटरचा पहिला टँकर आज १३ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाला असून, धाराशिव तालुक्यापासून केरोसिन पुरवठ्यास सुरुवात करण्यात येणार आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी केरोसिन टँकरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्ह्यातील केरोसिन वाटपाचा शुभारंभ केला.

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना हे केरोसिन प्रति लिटर ६३ रुपये दराने उपलब्ध होणार असून,प्रति कार्ड ३ लिटरप्रमाणे वितरण करण्यात येणार आहे.हे नियतन प्राधान्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आणि त्यानंतर प्राधान्य कुटुंब लाभ योजना शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
धाराशिव तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी आपल्या केरोसिन किंवा रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन केरोसिन खरेदी करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


  • Related Posts

    अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांवर धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा!

    Spread the love

    Spread the loveअध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मराठा सेवा संघातर्फे स्वागत; मराठा तरुणांच्या आर्थिक प्रश्नांवर सविस्तर संवाद धाराशिव : प्रशांत मते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे…

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *