अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांवर धाराशिवमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा!

Spread the love

अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे मराठा सेवा संघातर्फे स्वागत; मराठा तरुणांच्या आर्थिक प्रश्नांवर सविस्तर संवाद

धाराशिव : प्रशांत मते

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांचे धाराशिव येथे मराठा सेवा संघाच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना उपलब्ध होणाऱ्या कर्ज योजनांसह प्रलंबित कर्जप्रकरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, कर्जप्रकरणांची प्रक्रिया, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तसेच पात्र लाभार्थ्यांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.

मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योगासाठी आर्थिक पाठबळ मिळावे आणि महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी आवश्यक बाबींवर उपस्थितांनी नरेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधला.

या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार पवार, मुकुंद घाटगे, गणेश साळुंके, अतुल शेरकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या भेटीमुळे महामंडळाच्या कर्ज योजनांशी संबंधित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *