“माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

Spread the love

आरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा

  • धाराशिव – आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविणे हीच प्रगतीची खरी दिशा आहे.नव्याने उभारलेल्या आरोग्य संस्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल,तर ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून प्रत्येक गाव निरोगी,सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा संकल्प शासनाने हाती घेतला आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

      १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.यावेळी मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील,आमदार कैलास पाटील घाडगे,आमदार प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव हा मराठवाड्यातील आकांक्षित जिल्हा असून दुष्काळप्रवण परिस्थिती,ग्रामीण लोकसंख्या आणि वाढती आरोग्य गरज लक्षात घेता आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक होते. लोहारा तालुक्यातील माकणी व कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध आरोग्य उपकेंद्रांचे लोकार्पण ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची पायरी आहे.या सुविधांमुळे माता-बाल आरोग्य,लसीकरण आणि प्राथमिक उपचार अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०२६ पासून सुरू केलेले ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान हे गावागावात स्वच्छ,निरोगी आणि सशक्त समाज घडविण्याचे व्यापक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.या अभियानांतर्गत

क्षयरोग,कुष्ठरोग,हिवताप, डेंग्यू यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रणासोबतच मधुमेह,उच्च रक्तदाब, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान,गर्भवती मातांची काळजी,बालकांचे लसीकरण आणि कुपोषण निर्मूलनावर विशेष भर दिला जाणार आहे.असे सांगितले.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *