आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक वाहनांचे पूजन व लोकार्पण १ मे रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड,पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.



जिल्ह्यात पूरस्थिती,दुष्काळ,आग किंवा इतर नैसर्गिक संकटांना वेगाने तोंड देण्यासाठी “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेअंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक साहित्य,यंत्रसामग्री आणि वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली देण्यात आली होती.शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा नियोजन समिती यांच्या निर्देशानुसार ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.या निविदा प्रक्रियेतून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी शोध व बचाव कार्यासाठी जिल्हास्तरीय पथकाकरिता एक चारचाकी क्रूझर वाहन तसेच एक हायड्रॉलिक लॅडर वाहन खरेदी करण्यात आले आहे.
चारचाकी क्रूझर वाहनामुळे आपत्कालीन परिस्थितीत दुर्गम,पूरग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त भागात तातडीने पोहोचणे शक्य होणार आहे.

दोरखंड,लाईफ जॅकेट,बोट व इतर बचाव साहित्य वाहून नेण्यासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आपत्तीच्या काळात जलद प्रतिसाद देण्यासाठी अशा सक्षम वाहनांची आवश्यकता महत्त्वपूर्ण मानली जाते.तसेच हायड्रॉलिक लॅडर वाहनामुळे उंच इमारती,टॉवर किंवा आग लागलेल्या स्थळी अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोठी मदत मिळणार आहे. अग्निशमन,शोध व बचाव मोहिमा अधिक वेगाने आणि सुरक्षिततेने राबविण्यासाठी हे वाहन प्रभावी साधन ठरणार आहे.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ही वाहनसुविधा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील संकटसमयी नागरिकांच्या जीवितरक्षणासाठी प्रशासन अधिक सज्ज राहणार आहे.आधुनिक साधनसामग्रीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात अधिक गतिमान,सक्षम आणि परिणामकारक बनत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *