मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅबमुळे आरोग्य सेवेत नवी क्रांती ; नागरिकांना जलद,अचूक आणि विश्वासार्ह निदान सुविधा,पालकमंत्री प्रताप सरनाईक

Spread the love

पीसीआर मॉलिक्युलर व स्किल लॅबचे उद्घाटन

धाराशिव – ‘मॉलिक्युलर डायग्नोस्टिक लॅब’ सारख्या अत्याधुनिक सुविधांविषयी बोलताना अत्यंत आनंद होत आहे.आरोग्य क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झालेली प्रगती ही आपल्या समाजासाठी मोठी देणगी आहे.आजच्या काळात आजारांचे निदान जितके लवकर आणि अचूक होईल,तितके उपचार अधिक प्रभावी होतात.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

१ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या पीसीआर मॉड्युलर लॅब व स्किल लॅबचे उद्घाटन पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मंचावर मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,पोलीस अधीक्षक रितू खोखर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, मॉलिक्युलर लॅबमध्ये DNA, RNA आणि जनुकीय स्तरावर तपासण्या केल्या जात असल्यामुळे आजारांचे निदान जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येते.कोविड-१९, क्षयरोग (TB), एचआयव्ही,हिपॅटायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे असून ही सुविधा ते शक्य करून देते.या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक जंतू आणि विषाणूंची ओळख पटवता येते.एका पॅनेलमध्ये २५ ते १०० पर्यंत सूक्ष्मजंतू शोधण्याची क्षमता ही या प्रणालीची ताकद आहे.त्यामुळे रुग्णाला नेमका कोणता संसर्ग झाला आहे,हे त्वरीत समजते आणि योग्य उपचार देणे शक्य होते.असे श्री.सरनाईक यांनी सांगितले.

विशेष म्हणजे,मल्टिप्लेक्स PCR पॅनेलच्या माध्यमातून श्वसन संक्रमण,जठरांत्र संक्रमण,मेंदूज्वर,सेप्सिस,ट्रॉपिकल फीव्हर यांसारख्या विविध आजारांचे एकाच वेळी परीक्षण करता येते असे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,ही सुविधा आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवते.तसेच, अँटिबायोटिक प्रतिकार तपासणी ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज ठरत आहे.mecA, NDM, KPC यांसारख्या जनुकांची तपासणी करून औषधांना प्रतिकार करणारे जंतू ओळखता येतात.यामुळे डॉक्टरांना योग्य औषधोपचार निवडता येतात आणि रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होते.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *